विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे रुद्र यज्ञ व रक्षासूत्र बंधन कार्यक्रम २५ जुलै रोजी. ; पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे राहणार उपस्थित. ;

  • कार्यक्रमात सहभागी होण्याचे सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचे आवाहन.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या गौतस्करी आणि लव्ह जिहाद यासारख्या गंभीर प्रश्नांवर जनजागृती आणि हिंदू धर्मरक्षणासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने रुद्र यज्ञ व रक्षासूत्र बंधन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या कार्यक्रमाला बहुसंख्य हिंदू बांधवांनी सहभागी होऊन बजरंग दलामध्ये नाव नोंदणी करावी असे आवाहन सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 25 जुलै 2025 रोजी, दुपारी 3 वाजता पार पडणार असून, या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, गोरक्षक पंडित दादा मोडक, ॲड. देवदास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वाढत चाललेली गौतस्करी, लव्ह जिहाद यासारख्या घटनांवर सखोल चर्चा होणार असून, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी युवकांनी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे उद्दिष्ट:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेल्या गौतस्करी आणि लव्ह जिहादविरोधात जनजागृती हिंदू समाजात एकता आणि धर्मबांधवांमध्ये सजगता निर्माण करणे ,युवकांना बजरंग दलाशी जोडून धर्मरक्षणाच्या कार्यात भाग घेण्यासाठी प्रेरित करणे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व बजरंग दल कार्यकर्त्यांनी तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कृष्णा धुळपनावर, सावंतवाडी संयोजक साईराज नार्वेकर, आणि सहसंयोजक जितेंद्र रायका यांनी केले आहे.

तसेच सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनीही संपूर्ण हिंदू समाजाने एकत्र येऊन या कार्यक्रमात उपस्थित राहून हिंदू धर्माचे ऐक्य अबाधित ठेवावे, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles