सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तथा माजी मुख्यमंत्री यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो यासाठी मंदिरामध्ये लघुरुद्र यज्ञाचे आयोजन करून सत्तरावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेला बैठकीमध्ये घेण्यात आला. या बैठकीमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सावंतवाडी येथील कोकण रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा चालकांचा गुरुवारी २४ जुलै रोजी मळगाव रेल्वे टेशन या ठिकाणी आरोग्य किट वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार असून रिक्षा चालकांना आरोग्य किटचे वाटप केले जाणार आहे. २४ जुलै पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा होत आहे.
शुक्रवार २५ जुलैला वेत्ये येथील प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११.०० वाजता होणार आहे. तर रविवारी २७ जुलैला सायंकाळी तीन वाजता काझी शाहबुद्दीन सभागृहात सावंतवाडी तालुक्यातील दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच सोमवार २८ जुलै रोजी सावंतवाडी शहरातील मंदिरामध्ये लघुरुद्राचा धार्मिक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांमध्ये परमेश्वरासमोर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य मिळावे, अशी सामूहिक प्रार्थना केली जाणार आहे.
या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनार्थ सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत ही माहिती तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी दिली. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, शहर प्रमुख शैलेश गंवडळकर, शहर संघटक निशांत तोरसकर, दर्शना चराठकर, शहर संघटक श्रुतिका दळवी, महिला तालुका संघटक नम्रता झारापकर, आबा केरकर, उपतालुकाप्रमुख अशोक धुरी, विनोद ठाकूर, सुनील गावडे, विनोद काजरेकर ,पुरुषोत्तम राऊळ संदेश केरकर, शिवदत्त घोगळे, संदीप गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते.


