सावंतवाडी : रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. अध्यक्षपदी सिद्धेश सावंत, तर सचिवपदी अवधूत राणे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी भावेश भिसे, तर खजिनदारपदी कुणाल सावंत यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून पुढील रोट्रॅक्टर्सची निवड करण्यात आली आहे –
विहंग गोठोस्कर, पृथ्वीराज चव्हाण, मिहिर मठकर, नितेश मठकर, श्रिया मठकर, निकिता आराबेकर, विनायक कुडतरकर, शुभम सावंत, शिवम सावंत, सानिका गावडे, सौजन्या पवार, सुकन्या पवार, मेहुल रेडीज, आदित्य नाईक, प्रतीक मडगावकर, श्रद्धा गावठे, पूर्वा निर्गुण, सायली गावठे
या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शनिवार, दिनांक २६ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजता, रोटरी ट्रस्ट हॉल, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला रोटरी व रोट्रॅक्टचे सिंधुदुर्ग, तसेच डिस्ट्रिक्ट 3170 चे मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचा मावळत्या अध्यक्षा निकिता आराबेकर यांनी केले आहे.


