सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : जिल्ह्यातील वंचित घटकाच्या समस्या तात्काळ सोडविणे, प्रशासनात पारदर्शकता व गतीमानता आणणे तसेच प्रशासकीय यंत्रणांचे बळकटीकरण करुन जनता व प्रशासनामध्ये समन्वय साधण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार २६ जुलै रोजी दुपारी २ ते सायं.६ वाजता जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्यास संबंधित सर्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात वंचित घटकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याने नागरिकांनी आपले प्रश्न, निवेदने, तक्रार अर्ज घेऊन या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.


