Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

धन्यवाद बबनराव.!- आपल्या आंदोलनामुळे अखेर खड्डे बुजवलेत.! ; सावंतवाडीतील व्यावसायिक, वाहन चालक, नागरिकांनी मानले साळगावकरांचे आभार.

सावंतवाडी : बाजारपेठेमध्ये ठीक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे व्यावसायिक वाहन चालक व नागरिक अक्षरशा हैराण झाले होते. याची दखल घेऊन माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी सावंतवाडी बाजारपेठेतील रस्त्यावरील खड्ड्यांच्या विषयी नगरपरिषदेचा लक्ष वेदला होता.
साळगावकर यांनी दिलेला इशाऱ्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने काल रात्री खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन पूर्ण केले . त्यामुळे व्यावसायिक व वाहन चालक तसेच शहरातील नागरिकांनी साळगावकर यांचे मनःपूर्व आभार मानले.
साळगावकर हे नगराध्यक्ष असताना सावंतवाडी शहरातील स्वच्छतेबाबत नेहमीच अग्रेसर असायचे नगरपरिषदेमध्ये सकाळी जाण्यापूर्वी ते नेहमीच शहरांमध्ये एक फेरफटका मारायचे.
शहरातील अस्वच्छता संदर्भात काही त्रुटी आढळून आल्यास ते लगेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर तातडीने उपायोजना करायचे.
साळगावकर पालिकेतील कर्मचाऱ्यांशी आपल्या कुटुंबाप्रमाणे वागत त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात आजही त्यांच्यासाठी मोलाचे स्थान आहे.
सावंतवाडी शहरातील अस्वच्छता संदर्भात ज्यावेळी साळगावकर चार वर्षानंतर नगरपरिषदेमध्ये गेले असता सर्व कर्मचाऱ्यांनी उठून साळगावकर यांना मानसन्मान दिली.
सावंतवाडी नगरपरिषद कर्जमुक्त करण्यामध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा होता तर नगर परिषदेमध्ये पारदर्शक कारभार,स्वच्छ व सुंदर शहर हीच त्यांची एक लोकप्रिय नगराध्यक्ष म्हणून ओळख अजूनही आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles