Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

श्वेतक्रांती घडविण्याची क्षमता असणार्‍या बळीराजांना बळ देणार – विशाल परब यांची ग्वाही. ; सांगेली येथील गिरिजानाथ दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेच्या सभासदांना युवा नेते विशाल परब यांच्याकडून दुधाच्या किटल्या प्रोत्साहनपर स्नेहभेट.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाची फार मोठी संधी आहे. दुर्दैवाने या क्षेत्रात आजवर भरीव काम झालेले नाही. छोट्या मोठ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या अडचणीत मदत करणार असल्याची भूमिका भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी घेतली आहे. आगामी काळात दुग्ध व्यवसायातील शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

श्री विशाल परब यांनी सावंतवाडी मतदार संघात आपल्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमातून तळागाळातील जनतेशी नाळ जोडलेली आहे. सर्वसामान्य जनतेचा रोजगार, त्यांचे रोजचे जगणे मरण्याचे प्रश्न, आरोग्य, शिक्षण यात लक्ष देणारा “आपला माणूस” ही पूर्ण मतदार संघात विशाल परब यांची ओळख ठरली आहे.

आज श्री विशाल परब यांनी सांगेली येथील गिरजानात दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेला भेट देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन म्हणून सभासदांना दुधाच्या किटल्या भेट दिल्या. भविष्यात दुग्ध व्यवसाय हा शेती व्यवसायावर अवलंबून असणारा जोडधंदा म्हणून न राहता सहकाराच्या माध्यमातून तो उद्योग म्हणून कोकणात प्रभावी अर्थकारण करेल, आणि यासाठी इथल्या शेतकऱ्यांना माझे सर्वतोपरी सहकार्य राहील, असा विश्वास भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत स्वतःच्या खिशातून त्यांच्यासाठी मदत करणारे विशाल परब यांच्यासारखे युवा नेतृत्व आम्हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच आमचे हक्काचे राहील, त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे अशा भावना यावेळी संस्थेच्या शेतकरी सभासदांनी व सांगेली ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रम प्रसंगी विशाल परब यांच्या समवेत उपस्थित मान्यवर ॲड.अनिल निरवडेकर, सांगेली सरपंच लवू भिंगारे, पुरुषोत्तम राऊळ चेअरमन सोसायटी सांगेली, पंढरीनाथ पुनाजी राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंढरीनाथ लक्ष्मण राऊळ, पुंडलिक कदम, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, सांगेली गावाचे माजी उपसरपंच वामन नार्वेकर,माजी तंटा मुक्ती अध्यक्ष शांताराम सावंत, चंद्रकांत सनाम, बाळा देवकर, आनंद राऊळ, सामाजिक कार्यकर्ते रोहीत राणे आणि संस्थेचे सभासद शेतकरी व सांगेली ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles