सावंतवाडी : अभिनव उपक्रम घेणे ही सह्याद्री फाऊंडेशनची नेहमी खासियत राहिली आहे. समाजाशी नाळ जोडली गेलेली ती इतकी घट्ट आहे की सामाजिक कार्याचा एक पर्वत उभा केला आहे. तब्बल गेल्या वीस वर्षात अगदी तळागाळातील विषय घेऊन समाज उपयोगाचा ध्यास जणू सर्वांनी घेतला आहे. म्हणूनच आज सह्याद्री फाऊंडेशन जिल्ह्यात नावा रुपास आले आहे. आज २७ जुलै श्री. सुनील राऊळ यांचा वाढदिवस आणि याचे औचित्य साधत अभिनव उपक्रम हाती घेतला. तो म्हणजे मोती तलाव काठी फूट पाथ ब्लिचिंग पावडर टाकून शेवाळामुळे निसरडा झालेला भाग स्वच्छ करणे. आमच्या सगळ्या पदाधिकार्यांनी हे अतुलनीय काम आज सकाळी बजावले आणि मागील काही दिवसांत घसरून पडलेल्या घटनांना अप्रत्यक्ष वाचा फोडली व सामाजिक जाणिवेचे महत्व नजरेस आणले. सह्याद्री फाऊंडेशनचे हे कार्य अतिशय अभिनंदनीय आहे व नव संकल्पनेला वाव देणार आहे. असे अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी सांगितले.
जिथं कमी तिथं सह्याद्री फाऊंडेशनची हमी! : आता मोती तलावावर फिरताना कोणीच घसरून पडणार नाही.! : सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


