सावंतवाडी : येथील मिलाग्रीस शाळेत इयत्ता आठवी C मध्ये शिकत असलेली अमला विजेश हिचा पाच वर्षांचा भाऊ ॲलन वीजेश याला किडनी व लिव्हरचा गंभीर आजार झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी तातडीने केरळच्या विशेष रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
त्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. या उपचारांसाठी सुमारे 45 लाख रुपये खर्च आहे. यासाठी ॲलनच्या पालकांनी समाजातील दानशूर व्यक्तींना कळकळीची विनंती केली आहे. जे या पाच वर्षाच्या मुलासाठी आर्थिक मदत करू इच्छितात त्यांनी खालील फोटोमधील UPI आयडीवर आर्थिक मदत करावी ही विनंती.



