सावंतवाडी : गोवा राज्यातील मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या निवासस्थानी जाऊन सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाजाच्या वतीने त्यांची भेट घेण्यात आली. यावेळी कुंभार समाजाचे आमदार म्हणून त्यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व स्नेहसत्कारही करण्यात आला. याप्रसंगी यशवंत धोंडू शेदूलकर (प्रदेश उपाध्यक्ष/बांधकाम कमिटी अध्यक्ष), विलास गुडेकर (प्रदेश सचिव/बांधकाम कमिटी/उपाध्यक्ष), अॅड. प्रा. गणपत शिरोडकर सर (प्रदेश /संपर्क प्रमुख/बांधकाम कमिटी कार्याध्यक्ष), दिलीप हिंदळेकर (प्रदेश सचिव पत्रकार आघाडी तसेच बांधकाम कमिटी सचिव) उपस्थित होते.
दरम्यान, संत गोरा कुंभार समाज भवन सिंधुदुर्ग उभारणी करणार आहोत, आपण सहकार्य करा असे त्यांना आवाहन करण्यात आले. यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी ”तुम्ही कामाला लागा, आपान जे जे शक्य होईल ते ते सर्व सहकार्य करणार!” अशी ग्वाही दिली. त्यामुळे आता सिंधुदुर्गात संत गोरा कुंभार समाजभवन उभारणीसाठी गती मिळणार आहे.


