Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सावधान! – मुसळधार पावसाचा इशारा ! ; भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट जारी.

मुंबई : राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून काही भागात पाऊस ओसरल्याचे चित्र आहे. मात्र, काही भागात पावसाने विश्रांती घेतलेली नाही. आजही भारतीय हवामान खात्याने काही भागात अलर्ट जारी केलाय. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस चांगला असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवलाय. पंढरपुरकडेही पाऊस चांगला असल्याने धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. दरवर्षापेक्षा यंदा राज्यात मॉन्सून लवकरच दाखल झाला. विशेष म्हणजे राज्यातील जवळपास सर्वच ठिकाणी मॉन्सूनच्या पावसाचा जोर बघायला मिळाला.

भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा –

भारतीय हवामान खात्याकडून विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलाय. विजेंच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर ठिकाणी पावसाच्या सरी मध्यम स्वरूपात कोसळतील. बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासूचन पावसाला सुरूवात झाल्याचे बघायला मिळाले.

विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी –

देशातील इतर भागांमध्ये आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. जुलै महिन्याच्या अखेरीस जोरदार पाऊस पडताना दिसला. मात्र, आता परत पाऊस कमी जास्त होताना दिसतोय. राज्यातील काही भागांमध्ये अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड या भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे.

नागपूर, अमरावती, वर्धा, गोदिंया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये आज पावसाचा इशारा –

आज भारतीय हवामान विभागाने नागपूर, अमरावती, वर्धा, गोदिंया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात यंदा चांगलाच जोरदार पाऊस झाला आहे. अनेक नद्या भरून वाहत आहेत. मध्यंतरीच्या पावसाने गडचिरोलीच्या काही भागांचा संपर्क देखील तुडला होता. खडकवालसला धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने लगतच्या भागांना सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात देखील आज पाऊस हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात सतत पाऊस दिसतोय.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles