वेंगुर्ला : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वेंगुर्लातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात पार पडला. ह्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. श्रीराम दीक्षित व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक विनीत परब हे मंचावर उपस्थित होते.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. अभाविप सावंतवाडी शहर मंत्री ज्ञानेश्वर गवळी ह्यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका केली व त्यानंतर जिल्हा संयोजक विनीत परब ह्यांनी अभाविप परिचय करून दिला.
प्रमुख वक्ते दीक्षित सर ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता देवेन कर्पे ह्यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या वाकडे हिने केले.
वेंगुर्लातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
अभाविप वेंगुर्लातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


