सावंतवाडी : भारतीय सैन्य दलातील 257 वर्ष पूर्ण झालेल्या दुसऱ्या मराठा (काली पांचवी ) या बटालियनचा 257 वा स्थापना दिवस बटालियनचे सिंधुदुर्ग जिल्यातील माजी सैनिक व सैनिक पत्नी व परिवार यांनी खेळीमेळी व उस्साहात सावंतवाडी येथील हॉटेल मँगो मध्ये साजरा केला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कॅप्टन बाबु पडते होते. दीप प्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमला सुरुवात झाली.सर्वात प्रथम शहीद जवानाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन दीपक राऊळ यांनी केले. महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण बोर्ड मध्ये नुकतेच सदस्य झालेले कॅप्टन कृष्णा परब यांनी सैनिकांना मिळणाऱ्या सुविधा समजावून सांगितल्या त्याचप्रमाणे कॅप्टन अनिल धाऊस्कर, सुभेदार रवींद्र पाताडे. अरुण गावडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. यावेळी नुकतेच सेनेमधून सेवा निवृत्त झालेले ना. सुबेदार रवी गावडे व हवालदार महेश देसाई व वीर नारी कॅनरा बँक मध्ये कार्यरत असलेले बिडये मॅडम यांचा सत्कार करण्यात आला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली अग्निवीर म्हणून भरती झालेली कुमारी कोमल राऊळ हिच्या आईवडिलांचा सुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला. कॅप्टन बाबु पडते यांनी 1965 च्या लढाई वर प्रकाश टाकला, सदर कार्यक्रमा साठी कॅप्टन विनायक खोचरे, सूर्यकांत पालव, गोविंद सावंत, संतोष सावंत, सुशांत मलिक, बाबु लांभर. सत्यवान राऊळ.चंद्रकांत गावडे. श्रीमती लिंगवत मॅडम सहपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन कॅप्टन विनायक खोचरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता मराठा स्फूर्ती गीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाने झाली.
भारतीय सैन्य दलातील 257 वर्ष पूर्ण झालेल्या दुसऱ्या मराठा (काली पांचवी ) या बटालियनचा 257 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


