कोल्हापूर : कलानगरी कोल्हापूरातील सुप्रसिध्द संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहास दि.८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती. या आगीत खासबाग कुस्ती मैदानाकडील मुख्य मंच आणि संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी आग लावली असावी अशी तक्रार नाट्यगृहाचे अतिरिक्त व्यवस्थापक समिर इस्माईल महाब्री (वय ४८ रा. शहाजी वसाहत) यांनी शुक्रवारी (दि.30) रात्री दाखल केली. या आगीमध्ये नाट्यगृहाचे १६ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाले होते.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


