Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

नेमळे गावात कायमस्वरूपी तलाठी नाही, शेतकर्‍यांच्या वाढल्या गैरसोयी !

सावंतवाडी :  तालुक्यातील नेमळे गावाला महसूली गाव म्हणून ओळखले जाते. गेले तीन चार महिने या गावात कायम स्वरूपी तलाठी नसल्याने शेतकरी वर्गाची मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे. या अगोदर या गावासाठी पाटोळे तलाठी काम पहात होते. त्यांची बदली तळवडे येथे झाल्यावर नेमळे गावासाठी निरवडे येथील तलाठी सोमवार आणि बुधवार असे दोन दिवस काम पाहत होते, मात्र तेही तलाठी रजेवर असल्यामुळे शेतकऱ्यांची सातबारा अभावी बरीच शासकीय तसेच बँक कर्ज प्रकरणासाठी कामे अडकून राहिली आहेत. त्यातच 2025/26 ची पिक पाहणी नोंद घालण्यासाठी 14 ऑगस्ट शेवटची तारीख असताना पिक पाहणी अॅपच बंद असल्याकारणाने खरीप हंगामातील भात पिकाची नोंद घालता येत नाही. यामुळे शासनाच्या सर्व लाभापासून नेमळे महसलातील शेतकरी वंचित राहणार आहेत.

सावंतवाडी तहसीलदार यांनी ताबडतोब याची दखल घेऊन नेमळे गावासाठी कायम स्वरूपी स्वतंत्र तलाठ्याची नेमणूक करून होणारी शेतकऱ्याची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नेमळे गावातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles