Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

पाडलोस गावातील ‘ओम गणेश बालसभा’ हा अतिशय स्तुत्य उपक्रम ! : तहसीलदार श्रीधर पाटील. ; अन्य गावांनी घ्यावा आदर्श.

सावंतवाडी : पाडलोस गावातील मुले एकत्र येऊन ‘ओम गणेश बालसभा’ हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत आहात. मी तर  पहिल्यांदाच अशी बालसभा बघत आहे. हा अतिशय चांगला उपक्रम आहे. प्रत्येक गावामध्ये अशी बालसभा व्हायला हवी, असे उद्गार सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी काढले.
पाडलोस-देऊळवाडी येथे पंचायत राज संस्था आणि समुदाय आधारित संघटना अंतर्गत ओम गणेश बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंतवाडी तहसीलदार यांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहत मुलांना शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर ओम गणेश बालसभा अध्यक्ष सानिका गावडे, सचिव गौतमी केणी, कोषाध्यक्ष साईश नाईक, सहसचिव दिशा पाडलोस्कर, उपसरपंच राजू शेटकर, मळेवाड प्रभाग सीएलएफ प्रचिती मडूरकर , पाडलोस श्री स्वामी समर्थ ग्रामसंघ अध्यक्ष मयुरी हरिजन, सचिव मयुरी कुबल, लिपिक शितल गावडे, जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या अध्यक्ष तेजल गावडे, पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, आशासेविका विजया गावडे, पालक शिवराम पाडलोसकर आदि उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व पालकांनी बालसभा नियमित होण्यासाठी आग्रह धरला. बालसभेत विद्यार्थ्यांनी गणितांची आकडेवारी, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्याबद्दल माहिती सांगितली. तर काही विद्यार्थ्यांनी संध्याकाळच्या वेळी एसटीचा फलक वेगळाच असल्याचे सांगितले. आशासेविका विजया गावडे यांनी आरोग्य विषयक माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल गावडे यांनी केले. प्रास्ताविक मयुरी कुबल यांनी करत बालसभेचे महत्त्व सांगितले. तेजल गावडे यांनी मैत्री दिनाबद्दल मार्गदर्शन करत आभार मानले.

मी पुन्हा येईन!
लहान मुलांसोबत सविस्तर चर्चा करण्यासाठी तसेच त्यांच्या संस्कारात भर घालण्यासाठी ‘मी पुन्हा येणार!’ असल्याची ग्वाही, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. तसेच निदान चार तास तरी आपल्या कुटुंबासमवेत मी पाडलोस ओम गणेश बालसभेला येणार असल्याचा शब्द तहसीलदार श्री. पाटील यांनी मुलांना दिला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles