कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत हर घर तिरंगा रॅलीचे व हर घर तिरंगा सेल्फी पाँईटचे आयोजन नगर पंचायत कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घराघरात तिरंगा ध्वजाचे उत्साहात स्वागत करावे, स्वातंत्र्याचा आनंद सर्वत्र पोहोचावा तसेच सर्व नागरिकांमध्ये स्वातंत्र्य दिनाचे चैतन्य दरवळत रहावे, यासाठी विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या विद्यार्थांनी ‘हर घर तिरंगा रॅली’ कणकवली शहरातून भारतीय स्वातंत्र्याच्या आणि विकसित भारताचे गौरव करणाऱ्या घोषणा देत वाद्याच्या गजरात हातात तिरंगा ध्वज फडकावत रॅली काढण्यात आली.

या रॅलीचे उद्गाटन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर व पर्यवेक्षक अच्युतराव वणवे सर यांनी केले तसेच हर घर तिरंगा रॅलीमध्ये नगर पंचायतीचे अधिकारी श्री आगम साहेब व नगर पंचायतीचे सर्व कर्मचारी सहभागी होते हर घर तिरंगा रॅलीचे नेतृत्व प्रशालेचे विज्ञान शिक्षक श्री पृथ्वीराज बर्डे श्री नेताजी जाधव सौ शिरसाट सौ केळुसकर यांनी केले .


