Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

शिवसैनिकांचे ‘महाआरती’ने MSEB अधिकाऱ्यांना सद्बुद्धी देण्याचे गणरायाला साकडे! ; उबाठा सेनेची लई भारी ‘गांधीगिरी’.

मळेवाड : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने रविवारी मळेवाड चौकातील श्री गणेश मंदिरात महाआरतीने महावितरणाच्या कारभाराविरोधात सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले. मळेवाड दशक्रोशीतील अनेक गावांत सातत्याने भेडसावणाऱ्या विजेच्या समस्यांबाबत गांधीगिरीच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करून महावितरणाच्या कर्मचारी व अधिकारी वर्गाला गणरायाने सद्बुद्धी द्यावी व आगामी काळात महत्त्वाचा चतुर्थी सण हा प्रकाशमय व्हावा, असं साकडं घालण्यात आले.

 

दरम्यान, कल्पना देऊनही महावितरणचे जबाबदार अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी जोरदार संताप व्यक्त केला. गणरायाची महाआरती झाल्यानंतर मळेवाड येथे कार्यरत जबाबदार अधिकारी उपस्थित झाल्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना जोरदार जाब विचारला.
यावेळी रुपेश राऊळ यांनी अधिकाऱ्यांचा पाणउतारा करत त्यांना धारेवर धरले. येत्या ८ दिवसांत सुरळीत वीज पुरवठा न झाल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान, १८ ऑगस्टपर्यंत सुरळीत वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी महाआरतीसाठी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, जिल्हा परिषद सदस्य राजन आबा केरकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, निशांत तोरसकर, गुरुनाथ नाईक, नीलेश शिरसाट, बाळा रेडकर, रवी तळवणेकर, मुन्ना मुळीक, नंदू नाईक, प्रकाश राऊत, वासुदेव राऊळ, सचिन गावडे, नम्रता झारापकर, स्मिताली नाईक, शिल्पा नाईक, सुभद्रा नाईक, प्रशांत नाईक, बाळा आरोंदेकर, संतोष पेडणेकर, अनिल विर्नोडकर, संजय रेडकर, गोकुळदास मोठे, रामदास पेडणेकर, सारंग कोरगांवकर, तुषार पालव, नितीन कांबळी, बबन राऊत, रवींद्र काजरेकर, रवी सावंत, अनिल जाधव, विलास परब आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी ग्रामस्थ रिक्षाव्यवसायिक व मळेवाड चौकातील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles