सावंतवाडी : श्री एकमुखी दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर, सबनीसवाडा, सावंतवाडी येथे श्रावण वद्य षष्ठी बुधवार दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी श्री.टेंबे स्वामी जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविक भक्तगणांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून श्री दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक व्यवस्थापन समितीने केले आहे.

यावेळी पुढील प्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 7.00 वा. एकमुखी दत्त पूजा, एकादशमी व लघुरुद्र. 9.00 वा. श्री सत्यदत्त महापूजा, दु. 12.30 वा. श्रींची आरती, 1.00 वा. महाप्रसाद, सायं. 7.00 वा. आरती.
7.30 वा. श्री टेंबे स्वामी पालखी सोहळा, रात्री 8.30 वा. भजन याप्रमाणे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.


