Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मळगावातील चाकरमान्यांसाठी ‘लई भारी’ बातमी! ; गणेशोत्सवानिमित्त मोफत बस सेवा, मळगाव ग्रामविकास मंडळ, मुंबईचा पुढाकार.

सावंतवाडी : कोकणवासीयांचा सर्वात मोठा सण गणेश चतुर्थी. या सणाला मुंबईत राहणारा प्रत्येक कोकणी माणूस हा सुट्टी काढून आपल्या कोकणातील गावी जातोचं, गावी जाणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांसाठी गावी पोहचण्यासाठी आव्हान असते वाहतुकीच्या तिकीटाचे.याचं समस्येवर तोडगा काढण्यासाठी खास गणेश चतुर्थी निमित्ताने आपल्या गावातील प्रवाशांची गावी येण्यासाठी दमछाक होऊ नये, याची सामाजिक जाणीव ठेवत मळगाव ग्रामविकास मंडळ, मुंबई यांनी गणेश भक्तांसाठी आपल्या गावातील लोकांसाठी मोफत बसची सोय केली आहे.
सदरील मोफत बस सोमवार दि.२५ रोजी सायंकाळी ५ वाजता दादर रेल्वे स्थानक वरुन मार्गस्थ होणार असून मळगाव गावातील मुंबईवासियांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त लोकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव ग्रामविकास मंडळाचे सचिव पांडुरंग राऊळ आणि अध्यक्ष लाडकोबा गावकर यांनी केले आहे.सदरील मोफत सेवेसाठी अधिक माहितीसाठी पांडुरंग राऊळ ९९६७३३३१०० यांच्याशी संपर्क साधावा असे म्हटले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles