🎊अंगारकी चतुर्थी🎊
“ॐ गं गणपतैय नमः”
वैदिक शास्त्रानुसार, अंगारकी चतुर्थी ही एक विशेष आणि वर्षातून फक्त एकदा येते अत्यंत शुभ अशी मानली गेलेली संकष्टी चतुर्थी असते जी मंगळवारी पडते.ही गणपतीची उपासना करणाऱ्यांसाठी अतिशय प्रभावी आणि फलदायी असते.हा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे या संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
अंगारकी चतुर्थी म्हणजे काय?संकष्टी चतुर्थी दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते.जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणतात.
“अंगारक” म्हणजे मंगळ ग्रहाचा एक नाव.म्हणून मंगळवारी येणारी ही चतुर्थी “अंगारकी” म्हणून ओळखली जाते.
या दिवशी गणपती आणि मंगळ ग्रहाची विशेष कृपा मिळते.
मेष रास:मंगळाचा स्वामी असल्याने उर्जेत वाढ,अडथळ्यांचे निर्मूलन.
सिंह रास:मानसिक स्थैर्य, प्रतिष्ठेत वाढ.
वृश्चिक रास:रोगप्रतिकारक शक्ती वाढते,ऋणमुक्तीचे योग
मकर रास:करिअर व व्यावसायिक यश.
कुंभ रास:मनोकामना पूर्ण होतात,संकटातून सुटका.
अंगारकी चतुर्थीचे उपाय आणि पूजन विधी:
सकाळी/सायंकाळी करावयाचे उपाय:
गणपतीचे व्रत/उपवास ठेवा.
संकष्टी गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष 11,21 किंवा 51 वेळा म्हणावे.
दूर्वा,शेंदूर व मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा.
मंगळ ग्रहासाठी “ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः” हा जप 108 वेळा करा.
रक्तवर्णी वस्त्र परिधान करा (मंगळाचे प्रतीक).
चंद्र दर्शनानंतर उपवास सोडावा.
गणपती मंदिरात लाडू किंवा मोदक दान करावे.
अंगारकी चतुर्थीचे फायदे:संकटांचे निवारण आरोग्य सुधारते,ऋणमुक्ती, कोर्ट-कचेरीचे प्रश्न मिटतात, मानसिक त्रास दूर होतो, मंगळदोष कमी होतो, विवाहात अडथळे दूर होतात.
🕉️🙏🕉️
अंगारकी संकष्टी चतुर्थी १२ राशींचे १२ मंत्र आणि प्रसाद –
राशीप्रमाणे दिलेल्या मंत्राचा जप करून राशीप्रमाणेच गणपतीला नैवैद्य अर्पण करावे
↕️
मेष:
मंत्र:ॐ वक्रतुण्डाय हुं”॥
प्रसाद: खजूर आणि गुळ खोबरं लाडू.
वृषभ:
मंत्र: ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं।
प्रसाद: खडीसाखर,साखर,नारळाचे लाडू.
मिथुन:
मंत्र:ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतेय वरवरदं सर्वजनं में वशमानायं स्वाहा॥
प्रसाद:मुगाचे लाडू,लाल फळ.
कर्क:
मंत्र:ॐ एकदंताय हुं
प्रसाद:मोदक,लोणी, खीर.
सिंह :
मंत्र:ॐ लंबोदराय नम:
प्रसाद:खजूर.
कन्या:
मंत्र:ॐ गं गणपतयै नमः॥
प्रसाद:हिरवे फळ,मुगाच्या डाळीचे लाडू आणि मनुका.
तुळ:
मंत्र:ॐ ह्रीं, ग्रीं, ह्रीं
प्रसाद:खडीसाखर,लाडू आणि केळी.
वृश्चिक:
मंत्र:ॐ वक्रतुण्डाय हुं
प्रसाद:खजूर आणि गुळ खोबरं लाडू.
धनू:
मंत्र:हुं गं ग्लौं हरिद्रागणपतयै वरवरद दुष्ट जनहृदयं स्तम्भय स्तम्भय स्वाहा॥
प्रसाद :मोदक व केळी.
मकर:
मंत्र:ॐ लम्बोदराय नमः
प्रसाद:मोदक,मनुका,तिळाचे लाडू.
कुंभ:
मंत्र:ॐ सर्वेश्वराय नमः
प्रसाद:गुळ खोबरं लाडू आणि हिरवे फळ.
मीन:
मंत्र:ॐ सिद्धी विनायकाय नमः
प्रसाद: बेसनलाडू,केळी आणि बदाम.
🕉️ नमःशिवाय
🙏शुभम् भवतु 🙏🕉️


