नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिककडून टॅरिफसाठी भारतावर एक दबाव निर्माण केला जातोय. अमेरिकेच्या या निर्णयानंतर अनेक देशांनी भारताची साथ दिली असून पाठिंबा दर्शवला आहे. टॅरिफच्या मुद्दावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले आहेत. फक्त हेच नाही तर भारताबद्दल गरळ ओकताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत. पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेकडून भारताला धमक्या दिल्या जात आहेत. आता भारताकडून अमेरिकेला चोख प्रतिउत्तर देण्याची तयारी सुरू आहे. मोठा धक्का भारत डोनाल्ड ट्रम्प यांना देतोय. भारताकडून सिंगापूरसोबत महत्वाचे आणि अतिशय मोठे असे 10 करार केली जाणार आहेत. विशेष म्हणजे या आठवड्यात दोन्ही देशांच्या मंत्र्यांमध्ये बैठक होणार असून कनेक्टिव्हिटी, कौशल्य विकास, तंत्रज्ञान या क्षेत्रांसह 10 करार होणार आहेत. या माध्यमातून दोन्ही देशांना वेगळी दिशा मिळणार आहे. यावर सध्या भारत आणि सिंगापूरमध्ये काम सुरू आहे. पुढच्याच आठवड्यात हे करार होणार आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातील करार हे अमेरिकेला मोठा धक्काच आहे.
भारतातून सिंगापूरला सौरऊर्जा पोहोचवण्यासाठी समुद्राखालून केबल टाकली जाणार आहे, या मोठ्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सध्या सुरू आहे. या प्रक्रियेमुळे डेटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग हे पुढच्याच महिन्यात भारत दाैऱ्यावर आहेत. त्याअगोदरच या 10 करारांना अंतिम स्वरून मिळण्याची शक्यता आहे. भारतातून सिंगापूरला ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजन निर्यात करण्याचा प्रस्ताव देखील यामध्ये आहे.
द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या एकंदर दृष्टिकोनाचा हा एक भाग असल्याचे सांगितले जातंय. अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयानंतर भारत आणि सिंगापूरमधील करार लवकरच होणार आहे, त्यानुसार पाऊले उचलली जात आहेत. काहीही झालं तरीही भारत अमेरिकेपुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट आहे. भारत अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयाला विरोध करत आहे. अमेरिकेची सर्वात मोठी समस्या ही रशियाकडून भारत कच्चे तेल विकत घेत आहे, हीच आहे.


