सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा येथील ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत गेली कित्येक वर्ष जुनी असल्याने,ही इमारत पुनर्बाधणी करून एक प्रशस्त अशी नूतन इमारत बांधण्याच स्वप्न आज पूर्ण झाल्याने आनंद झाल्याचे येथील उपस्थितांनी सांगितलं.
काही तांत्रिक अडचणीमुळे ही इमारत पुनर्बाधणी करताना अडचणी येत होत्या , मात्र जमीन मालकांच्या आणि गावातील ग्रामस्थांच्या , शासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही नूतन इमारत उभी राहिली असल्याचे उपसरपंच गोविंद (आबा) केरकर यांनी स्पष्ट केले. गावातील सरपंच,उपसरपंच सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी,कर्मचारी वर्ग ,ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्यामुळे ही प्रशस्त अशी इमारत उभी राहिली.
आरोंदा येथील ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारतीच उद्घाटन ,मानकरी रघुनाथ (बबन) नाईक ,सरपंच सायली साळगावकर यांच्या शुभ हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.

श्री गणेशाच्या , प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जमीनदार उल्हास नाईक आणि कुटुंब,मानकरी रघुनाथ(बबन) नाईक, ग्रामोन्नती मंडळ अध्यक्ष सुनील पिंगुळकर यांचा शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामपंचायत अधिकारी सतीश राणे यांनी केली.यावेळी उपसरपंच गोविंद (आबा) केरकर यांनी प्रास्ताविकामध्ये ग्रामपंचायत नूतन इमारत बांधण्या बाबत आलेल्या अडचणी आणि त्या कशा पद्धतीने सोडवून ही इमारत पुनर्बाधणी केली याबाबत माहिती दिली आणि या कामी सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
गावाच्या विकासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन आरोंदा पोलीस सहा .उपनिरीक्षक महेश अरवारी यांनी केले.तसेच गावाच्या हितासाठी आपली कधीही गरज पडली तर नक्की सांगा आपण मदत करायला तयार असल्याचे सांगून नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सरपंच सायली साळगावकर यांनी बोलताना सांगितले की,खरोखरच सर्वांच्या सहकार्यानं आणि मेहनतीने ही भव्य दिव्य अशी इमारत उभी राहिली असून यापुढेही गावाच्या विकासाठी सर्वांना सोबत घेऊन गावाची प्रगती करणार तसेच ग्रामपंचायत नूतन इमारत बाबत सर्वांच स्वप्न साकार झाल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वांच्या वतीने बाळा आरोंदेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून गावाच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे असे म्हटले तसेच या नूतन इमारत बांधण्यासाठी विशेष मेहनत घेतलेल्या सिद्धेश नाईक यांचे त्यांनी अभिनंदन करून कौतुक केले.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपापली मनोगत,विचार मांडले.
यावेळी ,तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर आरोंदेकर,ग्राम महसूल अधिकारी धोंडी पास्ते,सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया पवार,आरोग्य अधिकारी डॉ. ईशानी धुरी, पंचायत समिती माजी सदस्य सुधाकर नाईक, माजी सरपंच विद्याधर नाईक, पोलीस पाटील जितेंद्र जाधव,सीआरपी सुविधा नाईक,आशाताई मिनाक्षी साळगावकर,अंगणवाडी सेविका भावना चोडणकर,कन्या शाळा मुख्याध्यापक मंगल नाईक, मच्छीमार सोसायटीचे गोकुळदास मोटे,नरहरी नाईक,रणजीत नाईक,निखिल पार्सेकर,ज्येष्ठ नागरिक जयवंत नाईक,हेमंत नाईक,ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, सीआरपी,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना सिद्धेश नाईक यांनी सांगितले की,आपल्यावर नूतन इमारत बांधणी ची जबाबदारी देण्यात आली. सर्वांनी आपल्यावर जो विश्वास टाकला त्यामुळे आपण जिद्दीने, इमारत नूतनीकरणासाठी ध्यास घेतला आणि वास्तू उभी केली .यापुढेही आपण असेच सहकार्य करणार असल्याचे सांगून उपस्थित मान्यवरांचे, ग्रामस्थांचे आभार मानले.


