बांदा : सटमठवाडीत आत्यावशक सुविधा मिळण्याबाबत तसेच ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे सर्व कामे अपूर्ण असल्यामुळे उद्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थांसह उपोषण करणार असल्याचे सजग युवक तथा रहिवासी देवानंद सहदेव कळंगुटकर यांनी कळविले आहे.
आपण पुढील कारणांमुळे उपोषण करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
१. ग्रामपंचायतने खोट्या फसऊन सह्या घेऊन त्या रोड मधे बदल करण्याचा प्रयत्न केला.
२ सर्विस रोड पूर्ण व्हावा व तो करून घ्यावा यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करताना दिसत नाही.
३ व्यापारी व्यवसाईक यांची सततची अडवणूक सर्विस रोडवर होत असते.
४. तो रोड पूर्ण कधी होणार ? की सटमठवाडीतील लोकानी वर्षानुवर्षे याच समस्यांना किती दिवस सहन करावे.?
५ ग्रामपंचायत दर वेळी करून देतो म्हणून सांगून फसवणूक करत आहे.
६.२६ नंबर ला रोड लागला नाही अस सांगून तो रोड करायला सतत टाळाटाळ करत आहेत।
७ बोगदा हा ऑक्सिडंट कमी व्हावेत यासाठी मंजूर करून आणला होता.
तो आता अजून धोकादायक झाला आहे.
८ हायवे वरील व्यावसायिक सर्विस रोडवर गाड्या पार्किंग करत असल्याने सट मठ वाडी तील लोकांनी आता नक्की कुठच्या रोड ने जावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
९ अशा रस्त्यावर अपघात झाला तर पूर्ण पणे ग्रामपंचायत जबाबदार असणार आहे.
10.साटमठवाडी हायवे भोगद्यातील सर्व्हिस रोड आणी बाजारपेठेतयेण्या जाण्यासाठीचा रोड अपूर्ण.
11.सटमठवाडीतून बांदा येथे जाणारी पाईपलाईन वारंवार तुटत असून वारंवार कल्पना देऊन दुर्लक्ष केला जातो.
12.बांदा डिंगणे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर होऊन आलेला रोड अर्धवट राहिल्याने वाहतुकीस धोकादायक.


