वाशिंग्टन : अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आलाय. भारत अजून अमेरिकेच्या पुढे झुकला नाहीये. भारत आपल्या भूमिकेवर कायम आहे आणि अटी देखील मान्य केल्या नाहीत. मात्र, अमेरिकेकडून भारतावर वेगवगेळ्या पद्धतीने दबाव टाकला जातोय. हेच नाही तर अमेरिकेच्या भूमीवरून पाकिस्तानने भारताला हल्ल्याची धमकी दिली. भारत आणि अमेरिकेमधील तणाल वाढत असतानाच अनेक देशांनी भारताची साथ दिली असून अमेरिकेच्या अटी मान्य करू नये, असा सल्ला दिला आहे. भारतावर अमेरिकेकडून टॅरिफ लादण्यात आल्यानंतर पुतिन यांनी लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. काहीवेळ दोघांमध्ये फोनवर संभाषण झाले. रशिया भारताच्या पाठिशी आहे. रशियाकडून भारत तेल खरेदी करतो, हीच मोठी समस्या डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात 15 ऑगस्ट रोजी भेट होणार आहे. त्यापूर्वीच अमेरिकेकडून पुतिन यांना मोठा धमकी देण्यात आली आहे.
या भेटीचे दोन मुख्य कारण आहेत. एक म्हणजे युक्रेनसोबत रशियाचे सुरू असलेले युद्ध आणि दुसरे भारतावरील टॅरिफ भेटीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प हे रशियाला टार्गेट करत असतानाच काल रशियाकडून देखील आपली ताकद अमेरिकेला दाखवण्यात आली. आता भेटीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प हे धमकी देताना दिसत आहेत. यामुळे या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जर पुतिन यांनी या बैठकीत युद्धबंदीवर सहमती दर्शविली नाही तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
रशियन राष्ट्राध्यक्षांसोबत दुसऱ्या बैठकीची चांगली शक्यता आहे, ज्यामध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की देखील सहभागी होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले. झेलेन्स्की यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर संवाद साधला आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मुद्दावरून भारताच्याविरोधात सातत्याने भूमिका घेताना दिसत आहेत. पुढच्या महिन्यात मोदी हे अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भेट होईल. भारत टॅरिफला विरोध करत आहे.


