सावंतवाडी : येथील बाजारपेठेत श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर रंगबेरंगी सुबक व सुंदर अशा बाळकृष्णांच्या मुर्त्या दाखल झाल्या असून भाविक भक्तांना त्या मुर्त्यांचे आकर्षण वाढत आहे. 
(सावंतवाडी बाजारात दाखल झालेल्या बाळकृष्णच्या सुंदर व सुबक मुर्त्या. छायाचित्र – अनिल भिसे.)
महाराष्ट्रात आणि विशेषत: कोकणात श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला मोठा धुमधडाकात साजरा केला जातो. याच धर्तीवर बाळकृष्णांच्या मूर्ती खरेदीला ग्राहकांची चांगलीच गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.


