सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, तालुका शाखा-सावंतवाडी यांच्या वतीने रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री पंचम खेमराज कॉलेज हॉल, सावंतवाडी येथे सकाळी १०:३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्यात सन २०२३-२४ आणि सन २०२४-२५ या वर्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्याचबरोबर, नुकतेच सेवानिवृत्त झालेले कर्मचारी/अधिकारी, तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेले आणि पदोन्नती मिळालेले समाजबांधव यांचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष विनायक सूर्यकांत चव्हाण हे असतील. याशिवाय, जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, नायब तहसीलदार रवी निपाणीकर, संस्थापक अध्यक्ष अनंत ओटवणेकर, उपमुख्य अभियंता रविकिशोर चव्हाण, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव जगदीश चव्हाण यांनी केले आहे


