कणकवली : येथील फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगमध्ये उद्या दिनांक १६ व १७ ऑगस्ट रोजी “रंग-ए-रिवाज” या बहुरंगी महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख, कला, स्थापत्य आणि खाद्यसंस्कृती यांचे एकत्रित दर्शन घडवत हा कार्यक्रम अधिक आकर्षक केला आहे.
या महाउत्सवात प्रमुख आकर्षण ठरत आहेत :
राज्यनिहाय पारंपरिक पोशाखांचे सादरीकरण, जे विद्यार्थ्यांनी स्वतः डिझाईन करून हाताने तयार केले आहेत.
भारतीय स्थापत्यशैलीचे मिनिएचर मॉडेल्स, ज्यामध्ये गेटवे ऑफ इंडिया, राजस्थानच्या हवेल्या अशा विविध ठिकाणांचा समावेश आहे.
विविध प्रादेशिक खाद्यपदार्थांचा खाद्य महोत्सव, ज्यामध्ये महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, बंगाली, काश्मीरी आणि आसामी पदार्थांची चव घेता येणार आहे.
हा महाउत्सव सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत, फ्लोरेट कॉलेज, कॉलेज रोड, कणकवली येथे सर्वांसाठी खुला आहे.
“ही केवळ एक कला प्रदर्शनी नसून विद्यार्थ्यांच्या सृजनशक्तीचा आणि पारंपरिकतेचा संगम आहे,” असे प्रतिपादन कॉलेजच्या संचालिका कु. सार्था कदम यांनी केले. त्यांनी सर्व कलारसिकांनी या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.


