वेंगुर्ला : श्री माऊली विद्यामंदिर रेडी या प्रशालेमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री माऊली विद्यामंदिर या प्रशालेचे लिपिक शंकर पांडुरंग कर्णेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक चंद्रशेखर मोहन जाधव यांनी देशभक्ती गीतावर शाळेतील विद्यार्थ्यांची कवायत घेतली तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व उपस्थित ग्रामस्थ- पालक या सर्वानी जेष्ठ नागरिकासंबंधी प्रतिज्ञा घेतली. त्या नंतर साक्षरता प्रमाणपत्र श्रीमती सुनिता सावळाराम रेडकर यांना शंकर कर्णेकर यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी शाळेतील मुलांनी राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत देशभक्तीपर गीत इत्यादी गीतांचे सादरीकरण केले.

यावेळी सहाय्यक शिक्षक कुणाल बांदेकर, सहाय्यक शिक्षिका ज्योती वासुदेव, सुप्रिया पेडणेकर , पपेच्युअल डिसोजा , गोविंद चिपकर व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते प्रभारी मुख्याध्यापक चंद्रशेखर जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


