कुठ्ठाळी : कुठ्ठाळी येथील जगन्नाथ शेट कला संस्था ज्या प्रमाणात विविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देते, ही बाब खरोखरच अभिनंदनीय आहे, असे मत प्रमुख पाहुणे मुरगांव पत्तन न्यास शैक्षणिक संस्थेच्या दिपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक संजय बाणावलीकर यांनी 13 रोजी दुपारी 12.30 वाजता बायणा येथील रवींद्र भवनच्या मिनी सभागृहात बक्षीस वितरण कार्यक्रमात व्यक्त केले. ते कुठ्ठाळी येथील जगन्नाथ शेट कला संस्था व वेर्णा औद्योगिक संघठणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 19 व्या राज्यस्तरीय माध्यमिक व उच्च माध्यमिक देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे संजय बाणावलीकर, सन्माननीय पाहुणे दिपविहार उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. श्रीकांत पालसरकर, शिवदास नाईक, सौ शलाका कांबळी, परीक्षक प्रज्योत देसाई, सुभाष आलपारकर, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुनील शेट, सचीव डाॅ. स्नेहांकिता शेट उपस्थित होते.
या स्पर्धेतील उच्च माध्यमिक विद्यालययन गटातील पहिले बक्षीस रोख रक्कम, ट्राफी प्रमाणपत्र नावेली येथील रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयाने पटकावले. दुसरे कुडचडे येथील सी. टी. एन. उच्च माध्यमिक विद्यालयाला मिळाले. तर तृतीय कवळे फोंडा येथील श्री सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयाने पटकावले. तर उत्तेजनार्थ पारितोषिक वाडेनगर वास्को येथील श्री विश्वनाथ आरलेकर उच्च माध्यमिक विद्यालय व ओल्ड गोवा येथील व्ही. व्ही. एस. कुंकळीकर उच्च माध्यमिक यानी पटकावली.
माध्यमिक गटांमधील प्रथम रोख रक्कम, ट्राफी व प्रमाणपत्र कुडचडे येथील न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट याना, द्वितीय सडा येथील दीपविहार हायस्कूल, तृतीय वास्को येथील अवर लॅडी ऑफ देस्तेरो हायस्कूल व उत्तेजनार्थ पारितोषिक अंजुमन एच. आय. हायस्कूल व सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट यांना मिळाले.
यावेळी प्रा. श्रीकांत पालसरकर व शिवदास नाईक यांनी आपल्या भाषणात आयोजकांची तोंडभर स्तुती केली. अध्यक्ष प्रा.सुनील शेट यानी स्वागत व प्रास्ताविक करून उद्देश स्पष्ट केला व आभार प्रदर्शन केले. डाॅ. स्नेहांकिता शेट हिने मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. प्रज्योत देसाई व सुभाष आलपारकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले तर सौ.सुनयना शेट यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एकूण दहा उच्च माध्यमिक विद्यालय व सात माध्यमिक विद्यालयानी भाग घेतला.

(फोटो – 19 व्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेतील उच्च माध्यमिक विद्यालयीन गटातील प्रथम बक्षीस नावेली येथील रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयाला प्रदान करताना संजय बाणावलीकर, शेजारी शिवदास नाईक, प्रा.श्रीकांत पालसरकर, प्रा.सुनील शेट, सुनयना शेट, डाॅ. स्नेहांकिता शेट , प्रज्योत देसाई व सुभाष आलपारकर व शिक्षक वर्ग.)


