Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

गडहिंग्लज येथे २४ ऑगस्ट रोजी बेरड, बेडर, रामोशी समाजाचा वधू- वर – पालक परिचय मेळावा! ; विवाह इच्छुक मुला-मुलींनी नावे नोंदवून मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन!

गडहिंग्लज (प्रतिनिधी): नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ महाराष्ट्र राज्य व बेरड बेडर रामोशी मंडळ गडहिंग्लज यांच्यावतीने रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत गडहिंग्लज येथील संकेश्वर रोडवरील हॉटेल नीलकमलच्या पाठीमागे असणाऱ्या आंबेडकर भवन येथे वधु वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्य उपाध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ. बी. एस. पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, माजी जिल्हा कृषी अधिकारी सुखदेव चव्हाण, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील, थोर समाजसेवक वाय. पी. नाईक, माजी आयुक्त शिवमूर्ती नाईक, बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नाईक, मंडळ अधिकारी सुरेश जंगली, माजी प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब नाईक, मंडळ अधिकारी आप्पासाहेब जिनराळे, महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गंगाराम नाईक, शिक्षण विस्तार अधिकारी विलास पाटील, मुंबई उच्च न्यायालयाचे शिवाजी पाटील, डॉ. विठ्ठल पाटील, डॉ. प्रकाश पाटील, मुंबईच्या डॉ. सौ. पूजा नाईक -चव्हाण, मुंबई मंत्रालयाचे सुरेश नाईक, ग्राम महसूल अधिकारी ओंकार नाईक, गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हणमंत नाईक, सांगलीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. कविता नाईक, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, प्रा. डॉ. निलेश तलवार, प्रा. राम नाईक, निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक सुभाना नाईक, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाजीराव नाईक, निवृत्त पोलीस उपाधीक्षक बाळासाहेब नाईक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्यात विवाह इच्छुक मुला, मुलींनी आपली नावे नोंदवून या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर वधू वर परिचय सेवा विनामूल्य असून मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या वधु वर पालकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी- 9850115081, 8010647691,
9421112410, 7709112162
या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles