दोडामार्ग : तालुक्यातील भेडशी येथील युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांना जनजागृती सेवा संस्था, बदलापूर यांच्यातर्फे ‘समाजरत्न’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. या संस्थेच्या वतीने आयोजित समारंभात माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. राजश्री धुमाळे यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी वेतोबा या गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्री तसेच सिंधुदुर्ग फाउंडेशनच्या अध्यक्ष अक्षता कांबळी, वास्को गोवा येथील सेवानिवृत्त शिक्षिका व कॉर्डिनेटर, मुंबई गोमतीकीय कवयित्री श्रीमती शुभांगी गुरव, साईकृपा कॅन्स्ट्रक्शनचे संस्थाध्यक्ष व साईभक्त राजू मानकर तसेच सेवानिवृत्त अधिकारी चंद्रशेखर उपरकर, संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, सचिव संचिता भंडारी यांसह अन्य उपस्थित होते.

युवा उद्योजक बाबा टोपले यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे धन्यवाद व्यक्त करून आगामी काळात आपण अजून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या विविध क्षेत्रात जोमाने काम करू, असा आशावाद व्यक्त केला. दरम्यान बाबा टोपले यांच्यावर पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदचा वर्षाव होत आहे.


