Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

बास्केटबॉल मिनीगट राज्य स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा निवड चाचणी २३ ऑगस्ट रोजी मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये होणार.

मालवण : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन आयोजित व सोलापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या नियोजनात सोलापूर शहर येथे दिनांक १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर 2025 रोजी मिनी गट मुले व मुली बास्केटबॉल राज्य स्पर्धा होणार आहेत.
या राज्य स्पर्धेत सहभागी होणार्या संघाच्या निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन ने टोपीवाला हायस्कूल मालवण च्या बास्केटबॉल मैदानावर शनिवार दिनांक २३/८/२०२५ रोजी दुपारी तिन वाजता निवड चाचणीचे आयोजन केले आहे…
ज्या खेळाडूंची जन्म तारीख ०१/०१/२०१२ नंतरची असेल अशा खेळाडूंना या निवड चाचणी मध्ये सहभागी होता येईल…
निवडचाचणी साठी येताना खेळाडूंनी सोबत आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र (ओरीजिनल) एक पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन यावे (सदर कागदपत्रे अनिवार्य आहेत)..
श्री प्रफुल्ल सामंत, श्री निशिकांत पराडकर,श्री प्रसाद चव्हाण यांची निवड समिती मुला ,मुलींचे संघ निवडणार आहेत..
निवडचाचणी मध्ये जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाडूंनी पालक अथवा प्रशिक्षकांसोबत मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष श्री सुरेंद्र सकपाळ , कार्याध्यक्ष विजय मागाडे यांनी केले आहे, अधिक माहितीसाठी सचिव श्री अजय शिंदे (९४२२३९४१८६ ) यांच्याशी संपर्क साधावा…

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles