पर्वरी (गोवा) : अक्षरांची ओळ, रेषांची जोड, आणि सुंदर हस्ताक्षराच्या कलेतून गोव्याच्या चिमुकल्या दक्ष क्षितिज परबने थेट राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे.
विझ इंटरनॅशनल स्पेल बी अँड रायटींग विझर्ड आयोजित राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत दक्षने तब्बल ३ लाख स्पर्धकांमध्ये बाजी मारत ७ वा क्रमांक पटकावला. केवळ १ ली इयत्तेत शिकणाऱ्या या चिमुकल्याने दाखवून दिलं की मेहनत, आत्मविश्वास आणि लेखनकलेवर प्रेम असेल तर वय कधीच अडसर ठरत नाही.
या यशाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा सचिवालयात दक्षचा सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी मुख्यमंत्री सावंत यांनी दक्षचे मनापासून कौतुक करत भविष्यात तो आणखी मोठं यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला.
दक्ष हा सावंतवाडी येथील ॲड. क्षितिज परब व अनुराधा परब यांचा सुपुत्र तर ॲड. प्रकाश परब व कवीयित्री सौ. उषा परब यांचा नातू आहे. कुटुंबाचा आणि शाळेचा अभिमान ठरलेला हा चिमुकला गोव्याच्या प्रत्येक घराघरात प्रेरणेचा किरण ठरत आहे.व तो मुळ सावंतवाडी सिंधुदुर्ग येथील असल्याने सिंधुदुर्गची मान पण उंचावली आहे.
गोमंतकाच्या भूमीतून उमललेला हा अक्षरांचा लहानसा फुलोरा संपूर्ण देशात सुगंध दरवळतोय.
दक्षचे हे यश केवळ कुटुंबापुरतेच मर्यादित नसून, संपूर्ण गोव्याचा व सिंधुदुर्ग चा अभिमान आहे.
सावंतवाडीचा सुपुत्र चिमुकला दक्ष क्षितिज परबने राष्ट्रीय स्तरावर फडकला गोव्याचा झेंडा ! ; हस्ताक्षर स्पर्धेत देशात ७ वा क्रमांक,
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]