पर्वरी (गोवा) : लोकमत सखी मंच, टॉक दि ऑरगॅनिक चॉईस व अंबिका ग्रँड गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धा सीजन – 2 चे प्रथम पारितोषिक पर्वरी येथील शिवशक्ती ग्रुपने पटकावले तर द्वितीय पारितोषिक श्रावणी ग्रुपला मिळाले. तिसरे विजेते फोंडा येथील स्मार्ट कस्तुरी ग्रुप हे ठरले.

या स्पर्धेचे उद्घाटन गोवा राज्याचे कला व संस्कृती खात्याचे माजी मंत्री व प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा राजीव गांधी कला मंदिरमध्ये घेण्यात आली. या उद्घाटन सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या रीना गावडे, सुषमा हरमलकर, टॉक दि ऑरगॅनिक चॉईसच्या मालक अनुष्का नाईक, लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते, परीक्षक पद्मजा शर्मा आदी उपस्थित होत्या.

दरम्यान या स्पर्धेत पर्वरी येथील शिवशक्ती ग्रुपने अत्यंत दर्जेदार प्रदर्शन करीत अव्वल स्थान पटकावले.
ADVT –
एस. एस. ऑप्टिक्स!
👓🕶️👓🕶️👓🕶️
💥 एका तासात चष्मा उपलब्ध करून देणारे हक्काचे दालन.
☎️संपर्क –
📲 8188883797, 8605380793
👇👇👇👇
🎯 VIDEO इथं बघा.
👇👇👇👇
https://youtube.com/shorts/kCc6tQ7UVrg?feature=share


