सावंतवाडी : आज सायंकाळी सहा वाजता माठेवाडा येथे रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्यामध्ये पाय जाऊन एका महिलेचा अपघात झाला सदर महिलेचा पायाला जखम झाल्याकारणाने तिला तत्काळ दवाखान्यामध्ये पाठवण्यात आले त्यानंतर तेथील रहिवासी बंटी माठेकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली यापूर्वी सदर खड्ड्याच्या बाजूला मोठा खड्डा पडला होता तो सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बुजवण्यात आला होता.
घटनास्थळी नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी दीपक म्हापसेकर यांनी पाहणी केली. उद्याच्या दिवसात नगर परिषदेद्वारा खड्डा बुजवला गेला नाही तर तो खड्डा तत्काळ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिमेंटकाँक्रेटने बुजवण्यात येईल, असे रवी जाधव यांनी सांगितले.


