वेंगुर्ला : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भजनी मंडळांना प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक चळवळ सुरू ठेवण्याच्या हेतूने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी देखील संदीप गावडे यांच्यामार्फत भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. वेंगुर्ला तालुक्यातील एकूण ४२ मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष पप्पू परब , जिल्हा कार्यकारणी सदस्य राजन गिरप, साई नाईक, युवा मोर्चा वेंगुर्ला तालुका अध्यक्ष प्रणव वायंगणकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सुजाता पडवळ मॅडम आदी मान्यवर तसेच वेंगुर्ला तालुक्यातील सर्व भजनी मंडळांचे सदस्य उपस्थित होते.


