कुडाळ : ज्यांनी गेल्या वर्षभरात या जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून अतिशय शांतपणे कामकाज पाहिले.विशेष म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक शांतपणे पार पाडली. जे नेहमीच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतात. समस्या ऐकून घेऊन शक्य असेल तर तात्काळ समस्या निवारण करतात ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी मा.अनिल पाटील साहेब येत्या ३१ ऑगस्ट रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत. आज कुडाळ एम. आय.इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर व मी,दोघांनी मिळून असोसिएशनच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

यावेळी साहेबानां चिवारच्या कारखान्यात श्री होडावडेकर यांच्या संकल्पनेतून तयार केलेली आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतीकृती तसेच आमच्या कोकणस्फूर्ती मध्ये तयार केलेले जांभूळ मोदक दिले,साहेबानां गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा पण दिल्या.


