Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

गणपती विसर्जन मिरवणुकीत सलमानचा जबरदस्त डान्स! ; ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप.

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरी दरवर्षी धूमधूडाक्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. सलमानची बहीण अर्पिता खानच्या घरात बाप्पाचं आगमन झालं होतं. यंदाही गणेश चतुर्थीदिनी संपूर्ण खान परिवार गणरायाच्या पूजेत मग्न दिसलं. बुधवारी संध्याकाळी झालेल्या आरतीत सलमान, त्याचे आई-वडील आणि भावंडं एकत्र आले होते. सर्वांनी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली आणि गुरुवारी दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन केलं. या विसर्जन मिरवणुकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ढोल-ताशाच्या गजरावर सलमानने त्याच्या कुटुंबीयांसोबत ठेका धरला. भाचा आहिलसोबत तो धमाल-मस्ती करतानाही दिसला. या व्हिडीओमध्ये सलमानसोबत त्याचा भावोजी आयुष, भाची आयत आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, झहीर खान, अर्पिता खान दिसले.

सलमानचे दोन्ही पुतणे अरहान आणि निर्वाण खानसुद्धा यावेळी नाचत होते. तर सलमानने भाचीसोबत डान्स केला. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या पतीसोबत या विसर्जन मिरवणुकीत पोहोचली होती. सोनाक्षी आणि तिचा पती झहीर इक्बालनेही मिरवणुकीत डान्स केला. सलमान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांना अशाप्रकारे एकत्र आणि आनंदी पाहून चाहतेसुद्धा खुश झाले. गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर सलमान राजकीय नेते राहुल कनल यांच्या घरी पोहोचला आणि तिथे गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी सलमानसोबत झेड प्लस सुरक्षा होती.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles