– रूपेश पाटील.
सावंतवाडी : कोकणात राणे म्हटले की एक वेगळाच पॅटर्न असतो. अनेकदा सामाजिक स्तरावर काम करत असताना हा अनुभव कित्येकांना आला आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यापैकी कोणीही शब्द दिला तो शब्द पाळला म्हणून समजायचा. म्हणूनच ‘राणेंची हमी तिथे काय नाही कमी’ असे सहज म्हटले जाते. समस्या कोणतीही असो राणेंचा शब्द म्हणजे शब्दच! काम झाले म्हणूनच समजा असाच प्रत्येक पुन्हा एकदा हळदीचे नेरूर चाफेली येथील जंगले कुटुंबीयांना आला आहे. तब्बल ३५ वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर चाफेली येथील सीताबाई रामा जंगले या वयोवृध्द महिलेच्या घरात विद्युत कनेक्शन पूर्ण झाले. मागील पंधरा वर्षापासून विद्युत मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा ते होत नव्हते. परंतु जगले कुटुंब पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबारात दाखल झाले आणि आपली कैफियत मांडणी आणि क्षणाचाही विलंब न होता वीज वितरण प्रशासनाची यंत्रणा ऍक्टिव्ह चार महिन्यात दिवस रात्र काम करून जंगले कुटुंबीयांच्या घरापर्यंत नवीन लाईन ओढण्यात आली त्यासाठी लाईटचे पोल उभारण्यात आले. आणि गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर ही जंगले कुटुंबाच्या घरातलाईट चालू झाली. ही लाईट चालू झाल्यानंतर सीताबाई आज्जीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. तो आनंद एवढा मोठा होता की त्याची कशातही तुलना करता येणार नाही. ज्या सर्वांनी या कामासाठी सहकार्य केले. हे विद्युत कनेक्शन देण्यासाठी लाईन टाकताना ज्यांच्या जमिनीतून लाईन टाकावी लागली त्यांनी आपली सर्व झाडे तोडून व स्वतः नुकसान करून कुठचीही आडकाठी न करता लाईन टाकण्यासाठी सहकार्य केले. त्यांचेही चाफेली ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले जात आहेत. या मुळे अनेक वर्षानंतर चाफेली गावाचे विद्युतीकरण शंभर टक्के पूर्ण झाले. त्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
- ग्रुप ग्रामपंचायत हळदीचे नेरूळ गाव झाले शंभर टक्के विद्युतीकरण.
- सरपंच दीप्ती सावंत, ग्रा.पं.सदस्य व लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांना यश!
या कामी सरपंच दीप्ती सावंत,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व लोकप्रतिनिधी,माणगाव विभागाचे शाखा अभियंता शेळके, ठेकेदार पावसकर यांच्या सह स्थानिक ग्रामस्थ आणि त्याठिकाणी पोल उभारण्यासाठी जमीन देणारे जमीन मालक यांच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास गेले.


