सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश केल्यानंतर सातत्याने झंझावाती दौरा करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील युवकांमध्ये आपली क्रेझ पुन्हा एकदा उंचावली आहे. आज सकाळी सावंतवाडी शहरातील विविध ठिकाणी लाडक्या गणरायाचे दर्शन घेऊन दुपारी वेंगुर्ला तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या रेडी गावातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.

- यावेळी युवा नेते विशाल परब यांचे रेडी गावातील गणेश भक्तांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत करत त्यांचे पुनश्च आगमनाबद्दल अभिनंदन केले.

दरम्यान जनसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी गणरायाने आपणाला योग्य दिशा देऊन तळ कोकणातील युवा वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्रधान करावी, असे साकडे युवा नेते विशाल परब यांनी बाप्पा चरणी घातले.




