सावंतवाडी : येथील सकल हिंदू समाजाचे व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तसेच कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे यांच्या ‘गावडेंचा राजा’ विघ्नहर्त्याचे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी आज भक्तीभावाने दर्शन घेतले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, झेवीयर फर्नांडिस, बंटी पुरोहीत, सत्यवान बांदेकर, क्लॅटस फर्नांडिस, दत्ताराम परब आणि बाळू गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गावडेंचा राजा या नवसाला पावणाऱ्या विघ्नहर्त्याच्या चरणी सीताराम गावडे यांनी आमदार निलेश राणे यांच्या उज्ज्वल राजकीय वाटचालीसाठी साकडे घातले. थोड्याशा कौटुंबिक गप्पांनंतर आमदार निलेश राणे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले .
‘गावडेंचा राजा’चे आ. निलेश राणे यांनी घेतले दर्शन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


