सावंतवाडी : ऐन गणेश चतुर्थीच्या महत्वपूर्ण उत्सवामध्ये कर्मचाऱ्यांनी पगार मिळत नाही. म्हणून संप पुकारला होता. पीएफ आणि त्यांच्या पगारावरती प्रांत अधिकाऱ्यांनी निर्णय दिला होता. तात्काळ पगार होतील असे गृहीत असतांना दहा दिवस झाले तरी कर्मचाऱ्यांना पगार अदा केला गेला नाही. सगळे कर्मचारी मुख्याधिकारी झाल्यासारखे वागत आहेत. कंत्राटी सफाई कामगारांचा पगार किती तर फक्त 13000/ चा. मात्र हा हक्काचा पगार गणपती उत्सवामध्येही त्यांच्या हातामध्ये मिळालेला नाही. गणेश उत्सवामध्ये कंत्राटी सफाई कामगारांना पगार दिले गेले नाहीत, हे लांच्छनास्पद आहे. अजूनही बिल काढण्यासाठी चाचपडत आहेत. प्रांताधिकारी हेमंत निकम यांचा जाब नगरपरिषद अधिकाऱ्यांना विचारावा लागेल, कर्मचाऱ्यांचे पैसे तात्काळ मिळण्याची व्यवस्था करा अन्यथा त्याचा जाब आम्हाला विचारावा लागेल, असा कडक इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांनी दिलाय.
…अन्यथा त्याचा जाब आम्हाला विचारावा लागेल! ; सावंतवाडी नगरपरिषद अधिकाऱ्यांना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांचा इशारा!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


