कोशांबी : उत्तर प्रदेशातील कोशांबी जिल्ह्यात एका १५ वर्षांच्या मुलीला (रिया) वारंवार साप चावल्याच्या घटनेने हैराण केले आहे. ही घटना समोर आल्यानंतर आरोग्य विभागाचे पथक या रियाच्या घरी गेले. त्यांनी तपासणी केली तर तिचे घर मातीपासून तयार झालेले होते. तिच्या घरात अनेक सापांची बिळे देखील असू शकतात. त्यामुळे साप वारंवार चावत असेल असे म्हटले जात आहे.
या टीमने तिच्या घराच्याजवळ औषधे फवारली. आणि रियावर उपचार देखील केले. परंतू आपल्या पुन्हा साप चावेल अशी रियाच्या मनात सापाची भिती बसलेली आहे. त्यामुळे ती टेन्शनमध्ये आहे. सध्या तिला जिल्हा रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डात भरती केले आहे. येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु आहे. या घटने संदर्भात सीएमओ डॉ. संजय कुमार यांनी सांगितले की हे सांगणे घाईचे ठरेल की साप विषारी आहे की नाही. आम्ही रियाच्या घरी पोहचलो तेव्हा तिचे घर साधे मातीचे होते. अनेक जागी बिळे असू शकतात. एकच साप चावला की अनेक सापानी चावले. याचा काही पुरावा नाही. आमची टीम रिया मोर्य हीच्यावर उपचार करीत आहे. तिची तब्येत ठीक आहे.
या प्रकरणात मेडिकल कॉलेज कोशांबीचे प्राचार्य डॉ. हरिओम कुमार सिंह यांनी सांगितले की एकच व्यक्ती ४२ दिवसात १२ वेळा सर्पदंशाची शिकार होऊ शकत नाही. हा एक प्रकारचा आजार आहे. ज्यास ‘रेप्टीकल फोबिया’ म्हणतात. हा रुग्ण रेप्टीकल फोबियाने पीडीत असू शकतो. उपचाराने तो ठीक होऊ शकतो. यावर उपचार आहेत. आपल्या येथेही हे उपचार उपलब्ध आहेत.
रेप्टीकल फोबिया किंवा हर्पेटोफोबिया –
रेप्टीकल फोबिया, वा हर्पेटोफोबिया पाली, साप आणि अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दलची अत्यंतिक आणि अतार्किक भिती आहे.ही भीती कोणत्याही व्यक्तीची दैनंदिन गतिविधी मर्यादित करु शकतो. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या फोटो किंवा विचारानेही या व्यक्ती तीव्र चिंताक्रांत होतात. या फोबियाचा उपचार करण्यासाठी मनोवैज्ञानिक थेरपी, विशेष रुपाची कॉग्निटिव बिहेवियरल थेरेपी (CBT), आणि काही प्रकरणात औषधांचाही समावेश आहे.


