सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांच्या मळगाव रेडकरवाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी महेश सारंग यांच्यासह तालुका मंडल अध्यक्ष संतोष राऊळ यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, सचिन रेडकर तसेच संपूर्ण रेडकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
दरम्यान श्री. सारंग यांनी रेडकर परिवाराशी सुसंवाद साधत सुख – दुःखाच्या गोष्टींची विचारपूस केली.


