सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोंसले यांनी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांच्या मळगाव रेडकरवाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी रेडकर कुटुंबीयांनी युवराजांचे स्वागत केले.
दरम्यान, युवराज लखमराजे यांनी रेडकर कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद साधत सुख – दुःखाच्या गोष्टींची विचारपूस केली.


