Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

रशियाचा मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली! ; अमेरिकेला दिला सर्वात मोठा धक्का!

मॉस्को : अमेरिकेकडून युक्रेन – रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. खास करून अमेरिकेकडून रशियाच्या आर्क्टिक एलएनजी 2 गॅस प्रकल्पावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र आता रशियानं मोठा निर्णय घेतला आहे, रशियाच्या या निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेची झोप उडाली आहे, अमेरिकेनं बंदी घातलेले गॅसचे टँकर आता रशियानं थेट चीनला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच रशियामधून निघालेलं वोसखोद नावाचं LNG गॅसचं टँकर चीनमध्ये दाखल झालं आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात देखील रशियानं चीनला गॅसचा पुरवठा केला होता. याचाच अर्थ असा की आता रशियाच्या ज्या उत्पादनावर अमेरिकेकडून प्रतिबंध घालण्यात आला होता, ती सर्व उत्पादनं चीनला निर्यात करत आहे, आणि अमेरिका केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, हा अमेरिकेसाठी मोठा झटका मानला जात आहे. बर्फाळ प्रदेशामुळे गॅसची वाहतूक चीनपर्यंत करणं ही सोपी गोष्ट नाहीये, मात्र आता आम्ही थांबणार नसल्याचं रशियाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

चीन आणि रशियाची जवळीक वाढली – 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेवर अनेक देश नाराज आहेत, रशिया आणि युक्रेन युद्धाचं कारण देत त्यांनी रशियावर अनेक प्रतिबंध लादले आहेत. दुसरीकडे भारतावर आणि चीनवर प्रचंड टॅरिफ लावला आहे. अमेरिकेनं घेतलेल्या या निर्णयामुळे आता भारत, चीन आणि रशियाची जवळीक वाढत आहे. हा अमेरिकेसाठी टेन्शनचा विषय बनला आहे, तर दुसरीकडे आता अशा स्थितीमध्ये रशियानं आपलं गॅस उत्पादन चीनला निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यानं हा अमेरिकेसाठी मोठा झटका मानला जात आहे.

चीनला काय फायदा होणार?

अमेरिकेनं रशियावर अनेक प्रतिबंध घातले आहेत, रशियामधील गॅस उत्पादनाबाबत अमेरिकेनं कडक भूमिका घेतली आहे. याचा फायदा आता चीनला होताना दिसत आहे, अमेरिकेनं प्रतिबंध लादल्यामुळे हे सर्व उत्पादन चीनला सवलतीच्या दरात उपलब्ध होत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्दालिमीर पुतिन नुकतेच चीनच्या दौऱ्यावर गेले होते. शि जिंपिग आणि पुतिन यांच्या भेटीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं होतं.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles