सावंतवाडी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे आज शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांच्या कोलगाव येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी महेश सारंग आणि सारंग कुटुंबीयांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे स्नेह स्वागत केले.
दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी श्री. सारंग आणि कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद साधत सुख – दुःखाच्या गोष्टींची विचारपूस केली व त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला.


