सावंतवाडी : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत दरवर्षी कला उत्सवाचे आयोजन करण्यात येते. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरांमधील विद्यार्थ्यांची प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देणे हा या कला उत्सवाचा प्रमुख उद्देश असतो.
यावर्षी कसाल हायस्कूल येथे पार पडलेल्या कला उत्सवामध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाची हॅट्रिक साधली आहे. कु.प्रिया प्रदीप देसाई या विद्यार्थिनीने द्विमितीय चित्रकला या कलाप्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर कु.हर्षिता संदीप देवरुखकर या विद्यार्थिनीने नाटक या कला प्रकारामध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक व विभाग स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.तर कु.नंदिनी रमेश राऊळ व कु. खुशी ज्ञानू गावडे या दोन विद्यार्थिनींनी समूह कथाकथन या स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक व विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सदर विद्यार्थिनींना श्री दत्ताराम नाईक, श्री अमोल राऊळ, श्री सुशांत जोशी, श्री गणेश डिचोलकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका श्रीम.संध्या मुणगेकर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
शालेय कला उत्सवात मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची यशाची हॅट्रिक!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]



 

