सावंतवाडी : कारिवडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष प्रशांत शिवराम राणे यांची फेर निवड करण्यात आली. शुक्रवारी झालेल्या
कारिवडे गावच्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.
यावेळी कारिवडे गावच्या सरपंच सौ आरती अशोक माळकर उपसरपंच श्री तुकाराम बाबाजी आमुनेकर ग्रामपंचायत सदस्य श्री महेश नारायण गावकर ग्रामपंचायत अधिकारी भरत दिगंबर बुंदे तलाठी श्रीम. शिरवलकर मॅडम कृषी सेवक श्री सरळकर भारतीय जनता पार्टी आंबोली मंडळ उपाध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक रामकृष्ण माळकर, सामाजिक कार्यकर्ते श्री अमोल कारीवडेकर तसेच श्री. अरविंद परब आणि आदी ग्रामस्थ व सर्व कर्मचारी उपस्थित होते. श्री प्रशांत शिवराम राणे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने कारिवडे ग्रामपंचायत सरपंच सौ आरती माळकर यांनी तसेच सर्व उपस्थित मान्यवरांनी प्रशांत राणे यांचे अभिनंदन केले