Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

‘शब्दांच्या पलीकडले’ पुस्तक अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार! : उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे. ; सुरेश ठाकूर यांच्या’शब्दांच्या पलीकडले’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न.

मालवण : “सुरेश शामराव ठाकूर यांचे ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक मराठी भाषेच्या अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार आहे. भाषा जेव्हा अभिजात होते, तेव्हा अनेक भाषांमधून, विविध संस्कृतीमधून वेगवेगळे शब्द आपल्या भाषेत येत असतात. अशा निवडक १११ शब्दांच्या कूळकथा आणि मूळकथा सुरेश ठाकूर यांनी या पुस्तकात चितारलेल्या आहेत. प्रत्येक विद्यामंदिरातील संदर्भ पुस्तकांच्या कपाटात ‘शब्दांच्या पलीकडले’ हे संदर्भ पुस्तक प्रमुख स्थान पटकावणार हे निश्चित!” असे गौरवोद्गार रामचंद्र आंगणे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. सिंधुदुर्ग तथा माजी स्वीय सहाय्यक शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सदर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादिवशी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना काढले‌. आपल्या भाषणात त्यांनी पुस्तकातील विविध उदाहरणे देऊन हे संदर्भ पुस्तक विद्यार्थी, पालक, शिक्षक, लेखक, पत्रकार भाषा अभ्यासक अशा सर्वांना उपयुक्त कसे ठरेल हे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवणचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच बा. ना. बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरे नं. १ येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरचे विद्यमान अध्यक्ष बाबाजी तथा तात्या भिसळे हे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ मालवणी कवी रुजारियो पिंटो, जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशीचे अध्यक्ष अशोक कांबळी, आचरे ग्रामपंचायत सरपंच जोरोन फर्नांडिस, डॉ. विनायक करंदीकर, द. शि. हिर्लेकर गुरुजी, नवीन शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे सदस्य भरत गावडे, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि कवी विठ्ठल कदम, म. ल. देसाई, सुरेंद्र सकपाळ, सुगंधा गुरव, रामचंद्र कुबल, पांडुरंग कोचरेकर, अनिरुद्ध आचरेकर, गुरुनाथ ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुस्तक रामेश्वर वाचन मंदिरला अर्पण
सुरेश ठाकूर यांनी ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक समारंभपूर्वक रामेश्वर वाचन मंदिराला अर्पण केले. अर्पण सोहळ्याच्या वेळी सुरेश ठाकूर म्हणाले, “रामेश्वर वाचन मंदिर या वाचनालयाने मला बालपणापासूनच सकस आणि चोखंदळ वाचनाचे वेड लावले. आजचे संदर्भ पुस्तक हे त्याचाच एक परिपाक आहे. त्याच माझ्या या शब्दतीर्थाला हे माझे पुस्तक अर्पण करीत आहे.”
अध्यक्ष स्थानावरून बोलताना बाबाजी (तात्या) भिसळे म्हणाले, “आजचा दिवस माझा परमभाग्याचा दिवस आहे. वाचनालयाच्या स्थापनेपासून जे जे अध्यक्ष झाले, त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी हे पुस्तक स्वीकारत आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करुन सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या वाचनालयाचा मी अध्यक्ष आहे हे माझे परमभाग्य आहे. यावेळी द. शि. हिर्लेकर गुरुजी, डॉ. विनायक करंदीकर, जोरोन फर्नांडिस, अशोक कांबळी आदींनी ‘शब्दांच्या पलीकडले’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शुभेच्छा दिल्या.
मालवणी कवी रुजारियो पिंटो तसेच कवी मंदार सांबारी यांनी प्रकाशन सोहळ्याला काव्यरूपी शुभेच्छा अर्पण केल्या. जेष्ठ कवी प्रमोद जोशी यांच्या आलेल्या कवितारुपी शुभेच्छा आणि ज्येष्ठ कोमसाप सल्लागार सदानंद कांबळी आणि ज्येष्ठ कवी गिरीधर पुजारे यांच्या साहित्यिक शुभेच्छांचे वाचन रामचंद्र कुबल यांनी केले.

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा संदेश –
कोमसापचे संस्थापक आणि ज्येष्ठ लेखक आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांनी खास पत्ररुपी संदेश लिहून आपल्या मौलिक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “सुरेश ठाकूर यांनी गेली अनेक वर्षे कोमसापच्या माध्यमातून कोकणातील उमलत्या आणि उमललेल्या लेखकांना हक्काची प्रकाश खिडकी उपलब्ध करून दिली आहे. आज त्यांचे हे पुस्तक सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे. मराठी शब्दांचे कूळ आणि मूळ धुंडाळण्याचा या पुस्तकात त्यांनी जो व्यासंगी प्रयत्न केला आहे, त्याचे कौतुक करावे असे वाटते. त्यांच्या उपक्रमाला माझे वडीलधारीपणाचे आशीर्वाद!”
‘शब्दांच्या पलीकडले’ या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे प्रकाशन आचरे सरपंच जोरोन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर सोहळ्याचे दीप प्रज्वलन सुरेंद्र सकपाळ यांच्या हस्ते झाले. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या आशीर्वादाचे पत्र अनघा कदम यांनी वाचून दाखवले. “मनातले दोन शब्द” हा पुस्तकातील भाग मधुरा माणगावकर यांनी वाचून दाखवला. प्रार्थनागीत रश्मी आंगणे यांनी सादर केले. तर सूत्रसंचलन रामचंद्र कुबल, प्रास्ताविक गुरुनाथ ताम्हणकर आणि आभार सुगंधा गुरव यांनी मांनले. या सोहळ्याला नितीन वाळके, चारुशीला देऊलकर, प्रकाश पेडणेकर, लक्ष्मणराव आचरेकर, स्मिता बर्डे, प्रमोद कोयंडे, रामचंद्र वालावलकर, सुरेश गावकर, कल्पना मलये, दीपक पटेकर, विजय चौकेकर, एकनाथ गायकवाड आदी मान्यवरांसहित कोमसाप शाखा मालवण, अ.भा.साने गुरुजी कथामाला मालवण, रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरे नं. १ आदी संस्थांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. आचरे पंचक्रोशीतील बहुसंख्य साहित्य रसिकांनी सदर सोहळ्यास आवर्जून आपली उपस्थिती लावली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles